Ads

अकोटमध्ये कावड-पालखी मिरवणुकीसाठी वाहतूक मार्गात मोठा बदल

By Nilesh Sir

September 6, 2026 7:09 am

Ads

चौथा श्रावण सोमवार कावड व पालखी मिरवणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर अकोट शहरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी, अकोट यांच्या कार्यालयाकडून अन्वये वाहतूक मार्ग वळविण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.

अकोट तालुक्यातील ७ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या कावड-पालखी मिरवणुकीत २४ मंडळे सहभागी होणार असून मोठ्या संख्येने कावडधारी शिवभक्त आणि नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. मिरवणुकीची सुरुवात अकोला नाका येथून होणार असून अकोला नाका ते श्री. शिवाजी महाराज चौक या सार्वजनिक मार्गावर सकाळपासून दुपारपर्यंत मिरवणूक राहणार असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

७ सप्टेंबरला हा मार्ग राहणार बंद

श्री. शिवाजी महाराज चौक ते अकोला नाका हा मार्ग ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग

या कालावधीत श्री. शिवाजी महाराज चौक ते अकोला नाका जाणाऱ्या वाहनचालकांनी पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा—

बस स्थानक रोड → रेल्वे स्टेशन → स्वामी विवेकानंद स्कूल → नरसिंग झोपडीसमोरील रोड → अकोला नाका

या मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाकडून आवश्यक व्यवस्था

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मिरवणूक आयोजकांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे आणि सार्वजनिक वाहतुकीस अनावश्यक अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

महत्त्वाचे म्हणजे, आदेशात ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या काळात अकोट शहरातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!