Ads

गोवंश मांस वाहतूक करणाऱ्यावर दहीहांडा पोलिसांचा कडक प्रहार! ५० किलो गोवंश मांस जप्त; एकावर गुन्हा

By Nilesh Sir

September 2, 2026 11:20 am

Ads

दहीहांडा ते कुटासा रोडवरील पेट्रोलपंपाजवळ पोलिसांनी नाकाबंदी करून गोवंश मांसाची वाहतूक करणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाला रंगेहाथ आरोपीच्या ताब्यातून अंदाजे ५० किलो गोवंश मांस आणि मोटारसायकल असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहीहांडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असताना एका इसमाकडून मोटारसायकलवरून गोवंश मांस विक्रीसाठी कावसा गावाकडे नेले जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे दहीहांडा ते कुटासा रोडवर नाकाबंदी करण्यात आली.

नाकाबंदी दरम्यान दहीहांडा गावाकडून एक इसम मोटारसायकलवरून येताना पोलिसांना दिसला. त्याच्या मोटारसायकलच्या मागील बाजूस पांढऱ्या रंगाच्या नायलॉनच्या दोन मोठ्या पोतड्या आढळून आल्या. पोलिसांनी मोटारसायकल थांबवून संबंधित इसमाची चौकशी केली असता त्याने आपले नाव मोहम्मद अफसर अब्दुल ललकार (वय २५), रा. दहीहांडा, ता. जि. अकोला यास पकडलं असता पोतड्यांमध्ये काय आहे, अशी विचारणा केली असता त्याने त्यामध्ये गोवंश मांस असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यानंतर पंचांसमक्ष घटनास्थळ पंचनामा व जप्ती पंचनामा करण्यात आला.

या कारवाईत पोलिसांनी अंदाजे ५० किलो गोवंश मांस, प्रति किलो ३०० रुपये या प्रमाणे अंदाजे १५ हजार रुपये किमतीचे, तसेच काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक MH30/BM/1521, अंदाजे ४० हजार रुपये किमतीची, असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दहीहांडा पोलिस ठाण्यात कलम ३२५ भा. न्या. सं. सह कलम ५(ब), ५(क), ९(ब) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई अकोट उपविभागीय पोलिस अधिकारी निखिल पाटील आणि दहीहांडा पोलिस ठाणेदार गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उपनिरीक्षक आशिष जाधव,पोलिस उपनिरीक्षक सागर कापसे,पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद दळवी आणि अनिल भांडे यांनी केली.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!