बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दहीहंडा पोलीस ठाण्याकडून दहीहंडा आणि रेल परिसरात फ्लॅग मार्च काढण्यात आला. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २६ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ७.२५ वाजेपर्यंत हा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता. दहीहंडा पोलीस ठाण्याचे ठाणेदा गोपाल ढोले यांच्या नेतृत्वाखाली दोन पोलीस अधिकारी, १६ पोलीस कर्मचारी तसेच १८ होमगार्ड जवानांनी या फ्लॅग मार्चमध्ये सहभाग घेतला.

l
बकरी ईद सण शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून संवेदनशील भागात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. दहीहंडा आणि रेल गावातील मुख्य रस्ते व गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी पायदळ मार्च करत नागरिकांना शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले.
दरम्यान, सणासुदीच्या काळात अफवांवर विश्वास न ठेवता पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.








Leave a Comment