Ads

ग्रामसेवक नाही, तर ग्रामसभा नाही!’ आगरमध्ये ग्रामस्थांचा एल्गार; कारभारावर गंभीर सवाल

By Nilesh Sir

August 27, 2026 4:33 pm

Ads

ग्रामसभेची दवंडी झाली, ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले; मात्र ज्यांच्यावर ग्रामसभेची जबाबदारी आहे, तेच ग्रामसेवक गैरहजर! अकोला तालुक्यातील आगर येथे या प्रकारामुळे ग्रामस्थांचा संताप अक्षरशः उफाळून आला आणि ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीत ग्रामसभा घेण्यास नागरिकांनी थेट विरोध केला. ग्रामसभेसाठी २४ ऑगस्ट रोजी गावात दवंडी देण्यात आली होती. त्यानुसार महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने ग्रामसभेला उपस्थित झाले. मात्र ग्रामसेवक गैरहजर असल्याचे समोर येताच ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली.


‘ग्रामसेवक नाही, तर ग्रामसभा नाही!’ अशी ठाम भूमिका घेत नागरिकांनी बरखास्त सदस्यांच्या समितीमार्फत ग्रामसभा घेण्यासही नकार दिला. ग्रामसेवकांनी स्वतः उपस्थित न राहता बरखास्त केलेल्या सदस्यांची समिती नेमून त्यांना ग्रामसभा घेण्याचे अधिकार दिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे संशयाचे वातावरण आणखी गडद झाले. विशेष म्हणजे, ग्रामसेवकांनी स्वतः ग्रामसभेला उपस्थित न राहता यापूर्वी बरखास्त केलेल्या सदस्यांची समिती नेमून त्यांना ग्रामसभा घेण्याचे अधिकार दिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे उपस्थित नागरिकांच्या संशयाला आणखी बळ मिळाले.

“ग्रामसेवक नाही, तर ग्रामसभा नाही!” अशी स्पष्ट भूमिका घेत ग्रामस्थांनी बरखास्त सदस्यांच्या समितीला ग्रामसभा घेण्यास विरोध केला. त्यामुळे नियोजित ग्रामसभा अखेर होऊ शकली नाही.ग्रामसेवकांच्या या कथित मनमानी कारभारामागे गावातील विकास निधी आणि प्रशासकीय कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या आरोपांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

गावकऱ्यांचा थेट सवाल — ग्रामसेवक गैरहजर का? बरखास्त सदस्यांमार्फत ग्रामसभा घेण्याची वेळ का आली? गावातील निधी आणि विकासकामांचा हिशोब कोण देणार? या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून निष्पक्ष चौकशी करावी, संबंधित ग्रामसेवकावर नियमानुसार कारवाई करावी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत अधिकृत ग्रामसभा घेण्यात यावी, अशी मागणी आगर ग्रामस्थांनी केली आहे.

आता या गंभीर आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेते आणि आगर ग्रामस्थांच्या प्रश्नांना कोण उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Article

सातपुड्याच्या ‘एंट्री गेट’वरच CCTV बंद! पोपटखेड तपासणी नाका वनविभागाच्या भरवशावर; सुरक्षेवर गंभीर सवाल

रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला पाच वर्षांनी हरवलेल्या महिलेची कुटुंबीयांशी पुनर्भेट; आधार ठरला शोधाचा महत्त्वाचा दुवा

हिवरखेडमध्ये महायुतीचा ‘महासंग्राम’! भाजप-शिंदेसेना आमनेसामने; नगरपालिकेत जोरदार राडा

दानापूरमध्ये ईद-ए-मिलादचा जल्लोष! आकर्षक देखाव्यांसह भव्य मिरवणूक; सामाजिक सलोखा अन् बंधुभावाचे दर्शन

ग्रामसेवक नाही, तर ग्रामसभा नाही!’ आगरमध्ये ग्रामस्थांचा एल्गार; कारभारावर गंभीर सवाल

घरकुल यादीत सरपंच पतीच पात्र? गांधीग्रामात खळबळ; ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर सवाल!

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!