Ads

हिवरखेडमध्ये महायुतीचा ‘महासंग्राम’! भाजप-शिंदेसेना आमनेसामने; नगरपालिकेत जोरदार राडा

By Nilesh Sir

August 27, 2026 8:51 pm

Ads

अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपालिकेत महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेसोबत टिपणी जोडण्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक आमनेसामने आले. पाहता पाहता वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि सभागृहासह सभागृहाबाहेरही जोरदार राडा झाल्याची माहिती आहे.

या घटनेत शिवसेना शिंदे गटाचे गटनेते रवी घुंगड आणि नगरसेवक ऋषिकेश पंचबुद्धे जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. नगराध्यक्ष सुलभा दुतोंडे यांच्या पती आणि मुलांनी गुंडांकरवी मारहाण केल्याचा गंभीर आरोप रवी घुंगड यांनी केला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

घटनेनंतर हिवरखेडमध्ये वातावरण चांगलेच तापले असून, भाजप आणि शिंदेसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. या हाणामारीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे, हिवरखेड नगरपालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आहे. डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवत नगराध्यक्षपदही आपल्या ताब्यात घेतले. अनुभवी नेत्या सुलभा दुतोंडे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. मात्र, त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये स्थानिक पातळीवर मतभेद असल्याचे चित्र समोर येत होते.आता थेट सर्वसाधारण सभेतच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि नगरसेवक भिडल्याने महायुतीतील स्थानिक पातळीवरील अंतर्गत संघर्ष पुन्हा ऐरणीवर आला आहे.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजप आणि शिंदेसेनेची युती असली, तरी हिवरखेडमधील या घटनेने स्थानिक पातळीवर मनोमिलनाचा अभाव आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. या प्रकरणाची वरिष्ठ नेतेमंडळी कितपत दखल घेतात आणि स्थानिक वादावर तोडगा काढण्यासाठी काय भूमिका घेतली जाते, याकडे आता अकोला जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!