Ads

एकाच दिवशी दोन कारवाया, तरीही तस्करी थांबत नाही! प्रशासनावर प्रश्नचिन्ह

By Nilesh Sir

March 18, 2026 8:33 am

Ads

अकोला जिल्ह्यात गोवंश तस्करीचा वाढता सुळसुळाट पुन्हा एकदा समोर आला आहे. एका दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी उघड झालेल्या घटनांनी प्रशासनासमोर गंभीर प्रश्न उभे केले आहेत. कत्तलीसाठी बाहेर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मंगळवारी सकाळी पातूर पोलीस स्टेशन हद्दीतील नांदखेड फाट्याजवळ टाटा कंपनीच्या मालवाहू वाहनाचा (MH 30 BD 5207) अपघात झाला. भरधाव वेगाने गोवंश वाहतूक करताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत एका गोवंशाचा मृत्यू झाला, तर चार ते पाच गोवंश जखमी झाले. जखमी जनावरांना तातडीने ‘आदर्श गोरक्षण संस्था’ येथे उपचारासाठी हलविण्यात आले. अपघातानंतर चालक व त्याचे साथीदार फरार झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दरम्यान, याच दिवशी रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत गोरक्षकांच्या मदतीने पोलिसांनी छापा टाकत चार ते पाच गोवंशांची सुटका केली. या कारवाईमुळे तस्करांचे जाळे किती सक्रिय आहे, हे पुन्हा स्पष्ट झाले.

यापूर्वीही बोरगाव मंजू परिसरात अशाच अपघातात दोन गोवंशांचा मृत्यू झाला होता. सततच्या घटनांमुळे गोवंश तस्करी अजूनही थांबलेली नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

गोवंशांना अमानुष पद्धतीने कोंबून, भरधाव वेगाने वाहतूक केल्याने अपघातांची शक्यता वाढत आहे. त्यामुळे नागरिक आणि गोवंश प्रेमींनी कडक कारवाईची मागणी केली आहे. आता पोलिस प्रशासन या बेकायदेशीर साखळीवर प्रभावी आळा घालणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!