Ads

माना पोलीस स्टेशन हद्दीत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा, २६ वर्षीय व्यक्तीसोबतचा बालविवाह रोखला!

By Nilesh Sir

March 16, 2026 10:22 pm

Ads

कायद्याचे रक्षणकर्ते आणि सामाजिक संस्थांच्या सतर्कतेमुळे एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले आहे. माना पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावामध्ये १७ वर्षीय मुलीचा विवाह २६ वर्षीय तरुणासोबत लावून दिला जात असताना,जिल्हा महिला व बालविकास कार्यलय अंतर्गत चाईल्ड लाईन, पोलीस यंत्रणा आणि ‘ॲसेस टू जस्टीस’ आय. एस. डब्ल्यू. एस. अकोला टीमने धाडसी कारवाई करत हा विवाह रोखला.


मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एका १७ वर्षीय बालिकेचा विवाह एका २६ वर्षीय प्रौढ व्यक्तीशी होणार होता. ही माहिती ‘ॲसेस टू जस्टीस’ आय. एस. डब्ल्यू. एस. अकोला टीम प्राप्त होताच, पोलीस स्टेशन माना, ‘ॲसेस टू जस्टीस’ आय. एस. डब्ल्यू. एस. अकोला पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. लग्नाची पूर्णतः तायरी झाली होती, जवळपास ४०० हुन अधिक वऱ्हाडी जमले होते, बँड पथक सज्ज होते, विवाहाचे विधी पार पडणारच होते, तेवढ्यात पथकाने तिथे पोहोचून कारवाई केली. व होणारा बाल विवाह थांबवीला, पथकाने वधु-वराकडच्या नातेवाईकांना आणि पालकांना ताब्यात घेऊन ग्राम पंचायत कार्यलयात आणले. त्यानंतर सर्वांना बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ बद्दल माहिती देवून बाल विवाहचे दुष्परिणाम समजावून सांगितले. त्यानंतर प्रकरण अकोला येथील बाल कल्याण समितीसमोर मांडण्यात आले.
बाल कल्याण समितीसमोर दोन्ही पक्षांची बैठक घेण्यात आली. यावेळी बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ बद्दल उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली.
अल्पवयीन वयात लग्न झाल्यास मुलीच्या शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक आयुष्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यात आली.
मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिचे लग्न करणे हा कायदेशीर गुन्हा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दोन्ही बाजूंच्या पालकांकडून “मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिचे लग्न लावणार नाही” अशा आशयाचे कायदेशीर हमीपत्र लिहून घेण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सचिव, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर आणि पोलीस पाटील यांना साक्षीदार म्हणून घेण्यात आले.


ही यशस्वी कारवाई बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ऍड. अनिता गुरव, सदस्य राजेश देशमुख, डॉ. विनय दांदळे, ऍड. शिला तोषनिवाल, प्रांजली जयस्वाल,जिल्हा महिला व बालविकास कार्यलय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, कम्युनिटी सोशल वर्कर रवींद्र सावरकर, चाईल्ड लाईन समन्वयक हर्षाली गजभिये, पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र वानखडे, पो. शिपाई आकाश काळे, महिला पोलीस शिपाई शीतल कावरे,
यांच्या सतर्कतेमुळे एका अल्पवयीन मुलीचे भविष्य सुरक्षित झाले असून, संपूर्ण जिल्ह्यात या पथकाचे कौतुक होत आहे.

Related Article

एकतर्फी प्रेमाचा विकृत सूड? निष्पाप चिमुकल्याची निर्घृण हत्या;

जिवंतपणी कुणी नव्हतं सोबत… मृत्यूनंतर मिळाला माणुसकीचा खांदा! अकोटमध्ये अनोळखी मृतदेहांना सन्मानाने निरोप देणारे पांडुरंग तायडे

जीवाशी खेळ? प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात आढळला डॉक्टरांचा ग्लोव्ह

चिचखेड फाट्यावर भीषण अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत चारचाकीचा चुराडा, चालक गंभीर जखमी

जन्माआधीच मृत्यूची नोंद!प्रसूती वेदनांपासून मृत्यूच्या वेदनेपर्यंत; एका आईची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

LCB अडचणीत; बुलढाण्यात पोलिसांचा मोठा घोळ? जिच्या हत्येप्रकरणी वडील-भाऊ जेलमध्ये, तीच तरुणी निघाली जिवंत, LCB च्या तपासावर गंभीर प्रश्न

No comments to show.

Leave a Comment