Ads

फायर सेफ्टीशिवाय गॅस विक्री.. ग्रामीण भागात प्रशासन झोपेत?

By Nilesh Sir

March 9, 2026 5:26 pm

Ads

अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात किराणा दुकाने आणि सेतू केंद्रांवर गॅस सिलेंडरची विक्री सुरू असताना प्रशासन मात्र कानाडोळा करत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. जीवघेण्या ठरू शकणाऱ्या गॅस सिलेंडरचा साठा नियम धाब्यावर बसवून ठेवला जात असतानाही संबंधित विभाग झोपेत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

ग्रामीण भागातील अनेक किराणा दुकाने तसेच सेतू केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा साठा ठेवण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. मात्र या ठिकाणी फायर सेफ्टीची कोणतीही उपाययोजना नाही, अग्निशामक यंत्र नाही, तसेच सुरक्षा नियमांचे पालनही होत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अशा धोकादायक परिस्थितीत एखादी आग किंवा स्फोटाची घटना घडल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याशिवाय ज्या दुकानदारांकडे गॅस सिलेंडरचा साठा ठेवण्यात आला आहे त्यांना अग्निसुरक्षा प्रशिक्षण देण्यात आले आहे का, हा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कारण गॅससारख्या ज्वलनशील वस्तूंची साठवणूक करताना कडक नियमांचे पालन करणे आवश्यक असते.

दरम्यान, या संपूर्ण प्रकाराकडे पुरवठा विभाग आणि संबंधित प्रशासनाचे उघड दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा साठा होत असताना प्रशासनाला याची माहिती नाही का, की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे.

एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे तातडीने या प्रकाराची चौकशी करून नियमबाह्य साठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!