Ads

रानडुकराचा जीवघेणा हल्ला; ६० वर्षीय शेतमजूर गंभीर जखमी, वनविभाग विरोधात संताप

By Nilesh Sir

March 7, 2026 3:24 pm

Ads

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात देवरण शिवारात रानडुकराच्या जीवघेण्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात ६० वर्षीय शेतमजूर गंभीर जखमी झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सूरजप्रसाद विश्वास यांच्या शेतात आज सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास पाणी देण्याचे काम सुरू होते. यावेळी शेतमजूर करीम खान मोहम्मद खान (वय ६०) हे शेतात काम करत असताना अचानक एका रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढवला. अनपेक्षितपणे झालेल्या या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांनी तत्काळ धाव घेत जखमी करीम खान यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे देवरण शिवारासह आसपासच्या भागात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, शेतात काम करताना वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे जीव धोक्यात येत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना करून रानडुकरांचा बंदोबस्त करावा, तसेच जखमी मजूर करीम खान यांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व शेतकरी करत आहेत.

परिसरात वाढलेल्या रानडुकरांच्या वावरामुळे शेतकरी आणि शेतमजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Related Article

एकतर्फी प्रेमाचा विकृत सूड? निष्पाप चिमुकल्याची निर्घृण हत्या;

जिवंतपणी कुणी नव्हतं सोबत… मृत्यूनंतर मिळाला माणुसकीचा खांदा! अकोटमध्ये अनोळखी मृतदेहांना सन्मानाने निरोप देणारे पांडुरंग तायडे

जीवाशी खेळ? प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात आढळला डॉक्टरांचा ग्लोव्ह

चिचखेड फाट्यावर भीषण अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत चारचाकीचा चुराडा, चालक गंभीर जखमी

जन्माआधीच मृत्यूची नोंद!प्रसूती वेदनांपासून मृत्यूच्या वेदनेपर्यंत; एका आईची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

LCB अडचणीत; बुलढाण्यात पोलिसांचा मोठा घोळ? जिच्या हत्येप्रकरणी वडील-भाऊ जेलमध्ये, तीच तरुणी निघाली जिवंत, LCB च्या तपासावर गंभीर प्रश्न

No comments to show.

Leave a Comment