Ads

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

By Nilesh Sir

October 6, 2026 10:19 pm

Ads

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ : शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या संगीता कुशवाह मृत्यू प्रकरणात अकोला सत्र न्यायालयाने सासरच्या तीन आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील ॲड. किरण खोत, तर फिर्यादीच्या वतीने ॲड. शिवम शर्मा यांनी केलेला युक्तिवाद सुनावणीदरम्यान महत्त्वाचा ठरला.

अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलेल्या आरोपींमध्ये पप्पू ऊर्फ श्रावण कुशवाह (५७), राजेश कुशवाह (२४) आणि गुड्डी कुशवाह (५०) यांचा समावेश आहे. या प्रकरणात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात FIR क्रमांक ३१४/२०२६ दाखल असून, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०८, ८५, ११५(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अटक टाळण्यासाठी दाखल केला होता अर्ज

मयत संगीता हिचा विवाह २०१५ मध्ये दीपक याच्यासोबत झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक टाळण्यासाठी संबंधित आरोपींनी अकोला सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज क्रमांक ८१९/२०२६ दाखल केला होता.

या अर्जावर सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने आरोपींच्या जामिनाला जोरदार विरोध केला. गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असून तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. त्यामुळे प्रकरणातील विविध बाबींची सखोल चौकशी करण्यासाठी आरोपींची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील ॲड. किरण खोत यांनी केला.

फिर्यादीच्या वकिलांचा भक्कम युक्तिवाद

फिर्यादीच्या वतीने ॲड. शिवम शर्मा यांनीही न्यायालयासमोर विविध मुद्दे मांडत आरोपींच्या जामिनाला विरोध केला. एफआयआर दाखल करण्यात विलंब झालेला नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

तसेच, फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, पैशांच्या मागणीवरून संगीता हिचा छळ करण्यात आला होता. घटनेपूर्वी संगीता हिने आपल्या भावाशी संपर्क साधून सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी मारहाण होत असल्याचे सांगितल्याचा दावा सुनावणीदरम्यान करण्यात आला.

मयताच्या अंगावरील बाह्य दुखापती दर्शविणारी कागदपत्रे तसेच छायाचित्रेही न्यायालयासमोर सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

केस डायरीतील छायाचित्रांची न्यायालयाने घेतली दखल

सरकारी वकील ॲड. किरण खोत आणि फिर्यादीचे वकील ॲड. शिवम शर्मा यांच्या युक्तिवादासोबतच केस डायरीतील कागदपत्रे आणि मृतदेहाची छायाचित्रे न्यायालयासमोर ठेवण्यात आली.

उपलब्ध माहितीनुसार, न्यायालयाने मयताच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा प्रथमदर्शनी दिसून येत असल्याची नोंद केली. तपास अद्याप सुरू असल्याने आरोपींना अटकपूर्व जामीन दिल्यास तपासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा मुद्दाही न्यायालयासमोर मांडण्यात आला.

६ ऑक्टोबर रोजी न्यायालयाचा निर्णय

या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर प्रथम अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. बी. नाईकवाड यांनी ६ ऑक्टोबर २०२६ रोजी तिन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सिटी कोतवाली पोलिसांकडून सुरू असून, न्यायालयाच्या निर्णयानंतर तपासाची दिशा आणि पुढील कायदेशीर कारवाईकडे लक्ष लागले आहे.

Related Article

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

अकोला शहरात पाणीटंचाईचा इशारा; नवीन बोअरवेल खोदण्यावर बंदी, व्यावसायिक वापरावर निर्बंध

दिग्रस खुर्दमध्ये १२ एकरांतील सोयाबीनची गंजी पेटवली; शेतकऱ्याचे ४ ते ५ लाखांचे नुकसान

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!