Ads

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

By Nilesh Sir

October 6, 2026 9:14 pm

Ads

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ पातूर प्रतिनिधी स्वप्नील सुरवाडे:- पातूर तालुक्यातील देऊळगाव परिसरात दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन २२ वर्षीय युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात बाभूळगाव येथील गौरव संतोष बळकार हा युवक गंभीर जखमी झाला असून, प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गौरव संतोष बळकार हा दुचाकी क्रमांक MH 30 BV 4963 वरून बाभूळगाव येथून पातूरच्या दिशेने जात होता. दरम्यान, देऊळगाव परिसरात समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक TW 88 M 0435 सोबत त्याच्या दुचाकीची जोरदार धडक झाली.

या धडकेत गौरवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची तीव्रता लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी गौरवला पातूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी गौरववर प्राथमिक उपचार केले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. अपघाताच्या कारणांचा तसेच घटनेतील इतर बाबींचा तपास पातूर पोलीस करीत आहेत. या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, देऊळगाव परिसरातील या अपघातामुळे काही काळ घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. दुचाकीस्वार आणि अवजड वाहनांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्नही या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Related Article

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

अकोला शहरात पाणीटंचाईचा इशारा; नवीन बोअरवेल खोदण्यावर बंदी, व्यावसायिक वापरावर निर्बंध

दिग्रस खुर्दमध्ये १२ एकरांतील सोयाबीनची गंजी पेटवली; शेतकऱ्याचे ४ ते ५ लाखांचे नुकसान

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!