Ads

---

सत्तेच्या हव्यासात रक्ताचं नातं संपवलं! ७ वर्षांच्या चिमुरडीची निर्घृण हत्या

By Nilesh Sir

February 4, 2026 8:38 am

Ads

राजकारणाच्या हव्यासाने माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो, याचं अंगावर काटा आणणारं उदाहरण समोर आलं आहे. **तील जिल्ह्यातील तालुक्यात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच होण्याची इच्छा आणि आर्थिक अडचणी यामुळे एका वडिलांनी आपल्या ७ वर्षांच्या चिमुरड्या मुलीला कालव्यात बुडवून ठार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

आरोपी वडील पांडुरंग कोंडामंगळे, रहिवासी बारहाली गाव, यांनी तीन दिवसांपूर्वी पत्नीला खरेदीसाठी जाण्याचं सांगून घरातून बाहेर पडत मुलगी प्राची (७) हिला सोबत नेलं. मात्र काही वेळातच तो एकटाच घरी परतला. यामुळे कुटुंबीयांचा संशय बळावला आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

तपासादरम्यान यांनी धागेदोरे जोडत आरोपीला पकडलं. चौकशीत त्याने बोधन रोडवरील कट्टापल्ली परिसरात असलेल्या कालव्यात मुलीला फेकल्याची कबुली दिल्याची माहिती समोर येत आहे. सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून, आणखी एका संशयितालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. या घटनेमागचं संपूर्ण सत्य लवकरच उघड होण्याची शक्यता आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!