Ads

---

शेलू वेताळ हल्ला प्रकरणातील 4 फरार आरोपी मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात

By Nilesh Sir

February 2, 2026 8:49 am

Ads

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील शेलू वेताळ येथे यात्रेदरम्यान झालेल्या चाकू व दगडाने जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी फरार असलेल्या चार आरोपींना अखेर अटक करण्यात मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. घटनेनंतर आरोपी सतत ठिकाणे बदलत पोलिसांना चकवा देत होते. मात्र ऑपरेशन प्रहार अंतर्गत ही शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली.

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या ठोस मार्गदर्शनाखाली आणि ठाणेदार श्रीधर गुठ्ठे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तपास सुरू ठेवला. अमरावती, नागपूर, मुंबई, ठाणे, कल्याण आणि पुणे या शहरांमध्ये सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीदारांच्या आधारे तब्बल २९०० किमीचा पाठलाग करण्यात आला.

अखेर पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात चारही आरोपींना शिताफीने जेरबंद करण्यात आले. आरोपींविरोधात बीएनएस अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींत खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!