Ads

मुंबई महापालिकेवर भाजपाचा निर्णायक हल्ला! पंतप्रधान मोदी थेट प्रचारात; मुंबईसह वसई–विरार, मीरा-भाईंदरमध्ये सभा

By Nilesh Sir

January 1, 2026 3:29 am

Ads

मुंबई महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत हस्तगत करण्याचा भारतीय जनता पक्षाचा ठाम निर्धार आता उघडपणे समोर आला आहे. या लक्ष्यपूर्तीसाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराच्या रिंगणात उतरणार असून, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आक्रमक प्रचाराची रणनीती आखली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांचे मुंबई, वसई–विरार आणि मीरा-भाईंदर येथे जाहीर सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय जैन समाजाच्या एका महत्त्वाच्या धार्मिक कार्यक्रमातही पंतप्रधानांची उपस्थिती राहणार असल्याने या दौऱ्याला सामाजिक आणि राजकीय अशा दोन्ही पातळ्यांवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या प्रचार दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातील काही भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, महायुतीच्या प्रचाराला धार देण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही मुंबईत जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीमुळे भाजपाच्या प्रचाराला आक्रमक धार मिळणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

मुंबई महापालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व असलेल्या विरोधकांना आव्हान देण्यासाठी भाजपाने केंद्रातील नेतृत्व थेट मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होत आहे. पायाभूत सुविधा, विकासकामे, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि ‘डबल इंजिन सरकार’चा अजेंडा यावर भाजपाचा प्रचार केंद्रीत असणार आहे.

एकूणच, पंतप्रधान मोदींच्या थेट सहभागामुळे मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची आणि निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसत असून, येत्या काळात मुंबईचे राजकारण अधिक तापणार हे निश्चित आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!