अकोल्यातील खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; न्यायालयात बचाव पक्षाचा गुणवत्तेच्या आणि तांत्रिक बाबींवर युक्तिवाद
अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २१ ऑटोंबर २०२६ | प्रतिनिधी अल्पवयीन मुलीशी संबंधित विनयभंग आणि अत्याचाराच्या आरोपांप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी शोएब खान फिरोज खान याला ८ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपीच्या वतीने न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला.
खदान पोलिसांत गुन्हा दाखल
प्रकरणातील उपलब्ध माहितीनुसार, १३ वर्षीय अल्पवयीन पीडितेने खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत आरोपी शोएब खान फिरोज खान आणि इतर आरोपींविरुद्ध अत्याचार व विनयभंगाचे आरोप करण्यात आले आहेत. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम ७४, ७५ आणि ७८ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.
या प्रकरणात पोलिसांनी ८ ऑक्टोबर रोजी आरोपीला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान आरोपीच्या वतीने जामिनासाठी युक्तिवाद करण्यात आला.
बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर जामीन
आरोपीच्या वकिलांनी प्रकरणातील गुणदोष आणि तांत्रिक बाबींच्या आधारे न्यायालयात युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला. आरोपीच्या वतीने ॲड. कैलास व्ही. अनमाने यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.






Leave a Comment