Ads

अकोट शहराचा मूकबधिर ज्ञानेश्वर ठरला हेल्मेटचा खरा ब्रँड ॲम्बेसेडर

By Nilesh Sir

August 7, 2026 9:49 am

Ads

अकोट | प्रतिनिधी :- अकोला जिल्ह्यात मोटरसायकल चालकांसाठी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू आहे. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. तरीही अनेकजण दंड भरतात, पण हेल्मेट घालण्याची सवय मात्र लावत नाहीत. अशा वेळी अकोट शहरातील एका मूकबधिर नागरिकाने आपल्या कृतीतून संपूर्ण समाजासमोर सुरक्षिततेचा खरा आदर्श उभा केला आहे.

अकोट शहरातील मूकबधिर ज्ञानेश्वर उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करतात. आज सकाळी कामाच्या शोधात ते अकोट–अकोला मार्गावर पायी जात असताना त्यांच्या डोक्यावर हेल्मेट असल्याचे दृश्य अकोला न्यूज नेटवर्कच्या कॅमेऱ्यात कैद झाले. विशेष म्हणजे ते मोटरसायकलवर नव्हते, तर पायी चालत होते. तरीही सुरक्षिततेची जाणीव म्हणून त्यांनी हेल्मेट परिधान केले होते.

आज अनेक वाहनचालक पोलिसांच्या दंडाची पर्वा करत नाहीत. नियम मोडतात, जीव धोक्यात घालतात आणि अपघातानंतर हेल्मेटचे महत्त्व लक्षात येते. पण ज्याला ऐकू येत नाही, बोलता येत नाही, त्या ज्ञानेश्वरने कोणतेही भाषण न देता आपल्या कृतीतून समाजाला मोठा संदेश दिला आहे.

हेल्मेट हे केवळ पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी नसून, ते आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचे कवच आहे. ज्ञानेश्वर यांची ही कृती प्रत्येक वाहनचालकाच्या मनात सुरक्षिततेची जाणीव निर्माण करणारी ठरत आहे.

अकोला न्यूज नेटवर्कचे आवाहन — दंड टाळण्यासाठी नव्हे, तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हेल्मेट घाला. कारण अपघात सांगून येत नाही, पण हेल्मेट अनेकदा मृत्यूला थांबवू शकते.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!