Ads

माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांची प्रकृती स्थिर;, मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत सुधारणा, गंभीर शस्त्रक्रियेवर जिद्दीने मात

By Nilesh Sir

August 5, 2026 1:29 pm

Ads

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक 5 जुलै 2026 : राज्याचे माजी क्रीडामंत्री, ज्येष्ठ लोकनेते तथा राष्ट्रीय कबड्डीपटू गुलाबराव गावंडे यांची प्रकृती सध्या स्थिर असून अमरावती येथे मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू असून वैद्यकीय तज्ज्ञांनी त्यांना संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी क्रीडामंत्री, ज्येष्ठ लोकनेते तथा राष्ट्रीय कबड्डीपटू भाऊ गुलाबराव गावंडे हे अमरावती येथे एका विवाह सोहळ्यासाठी गेले असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तसेच तीव्र डोकेदुखीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने अमरावती येथील रेनबो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात त्वरित सिटीस्कॅन करण्यात आल्यानंतर मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन न्यूरोसर्जन डॉ. स्वरूप गांधी, डॉ. अजिंक्य जामटे आणि डॉ. श्याम राठी यांच्या तज्ज्ञ पथकाने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. सुमारे तीन तास चाललेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे मेंदूतील रक्तस्त्राव नियंत्रणात आणण्यात आला.

ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असून गावंडे यांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा होत असल्याची माहिती मिळाली आहे. गुलाबराव गावंडे हे राज्याचे माजी क्रीडामंत्री तसेच जनसामान्यांशी घट्ट नाळ जोडलेले लोकनेते म्हणून ओळखले जातात. राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटू म्हणून त्यांनी क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले आहे. वयाच्या ७४ व्या वर्षीही ते सामाजिक, धार्मिक, राजकीय तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होत असतात.

शस्त्रक्रियेदरम्यान त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने अमरावती येथे उपस्थित होते. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी राज्यभरातील समर्थक आणि हितचिंतकांकडून प्रार्थना व्यक्त करण्यात येत आहेत.

आजारांनाही पराभूत करणारा लढवय्या!
राजकारण, समाजकारण आणि क्रीडा क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे माजी क्रीडामंत्री गुलाबराव गावंडे हे खऱ्या अर्थाने लढवय्या व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. राष्ट्रीय कबड्डीपटू म्हणून मैदानावर अनेक आव्हानांवर मात करणाऱ्या गावंडे यांनी सार्वजनिक जीवनातही जनतेशी कायम घट्ट नाळ जपली आहे.

अचानक उद्भवलेल्या मेंदूतील रक्तस्त्रावासारख्या गंभीर आजारावर यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यांनी पुन्हा एकदा जिद्दीने मात करण्याची चिन्हे दाखवली आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत. मैदानावर प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करणारा हा लढवय्या नेता, स्वतःवर आलेल्या संकटालाही त्याच जिद्दीने पराभूत करत आहे, अशी भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!