Ads

हेल्मेटवर धडक कारवाई… पण ‘स्कूल बस’च्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरूच?

By Nilesh Sir

August 5, 2026 8:45 am

Ads

अकोट | प्रतिनिधी :- अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आदेशानुसार १ ऑगस्टपासून संपूर्ण जिल्ह्यात हेल्मेट सक्तीची मोहीम जोरात सुरू आहे. विना हेल्मेट वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात असून वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी पोलिस प्रशासन कठोर भूमिका घेत आहे. मात्र, याच वेळी अकोट शहरातील काही शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

शहरात काही ठिकाणी ‘स्कूल बस’च्या नावाखाली ऑटो, चारचाकी प्रवासी वाहने आणि इतर वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचे चित्र दिसत आहे.अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा!आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा. चिमुकल्या विद्यार्थ्यांना अक्षरशः कोंबून नेले जात असल्याची चर्चा पालक आणि नागरिकांमध्ये सुरू असून, या प्रकाराकडे RTO विभाग, वाहतूक शाखा आणि संबंधित यंत्रणांचे लक्ष आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हेल्मेट नसल्यामुळे सामान्य नागरिकांवर दंडाचा बडगा उगारला जातो, मग विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित असलेल्या अशा वाहनांची नियमित तपासणी का होत नाही? संबंधित वाहनांकडे आवश्यक परवाने, फिटनेस प्रमाणपत्र, विमा, फर्स्ट एड बॉक्स, अग्निशामक यंत्रणा आणि इतर सुरक्षा निकषांची पूर्तता आहे का? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने जनतेसमोर ठेवणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.

विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक ही केवळ पालकांची नव्हे तर प्रशासनाचीही जबाबदारी आहे. वाहतूक नियम केवळ हेल्मेटपुरते मर्यादित नसून प्रत्येक प्रवाशाच्या, विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ते तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्यावर तातडीने कारवाई होणे अपेक्षित आहे.अनेकदा दुर्दैवी अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होते आणि त्यानंतर विशेष मोहीमा, तपासण्या व बैठका सुरू होतात. मात्र प्रश्न असा आहे की,अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा! आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.

एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहायची का? की त्याआधीच पोलिस अधीक्षक, RTO विभाग आणि वाहतूक पोलिस संयुक्त विशेष मोहीम राबवून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करणार?

अकोटमधील पालक आणि नागरिकांची आता एकच मागणी आहे—“सामान्य नागरिकांवर कारवाई होते, मग विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवरही तितक्याच कठोरपणे कारवाई व्हावी.अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा!आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.

विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही कोणत्याही दंड मोहिमेपेक्षा मोठी आहे. त्यामुळे हेल्मेट मोहिमेबरोबरच शालेय वाहतुकीची सर्वंकष तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली, तरच प्रशासनाचा ‘सुरक्षित वाहतूक’ हा संदेश खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचेल.

Related Article

पत्नीने यकृत दान करून वाचवले पतीचे प्राण; मुख्य मंत्री सहायता निधीच्या आर्थिक मदतीमुळे प्रशांत इंगळेंना मिळाले नवजीवन

दोन वर्षांनंतर गतीमंद मुलीची आईशी भावनिक भेट; महिला व बालविकास विभागाच्या प्रयत्नांना यश

माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांची प्रकृती स्थिर;, मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत सुधारणा, गंभीर शस्त्रक्रियेवर जिद्दीने मात

Bollywood Newsगजनी’चा खलनायक हरपला! ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या 74व्या वर्षी निधन

अकोट ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत बोर्डी–उमरा बीटमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट? पोलिस अधीक्षकांच्या कारवाईकडे लक्ष

हेल्मेटवर धडक कारवाई… पण ‘स्कूल बस’च्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरूच?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!