Ads

सातपुड्याच्या कुशीतला स्वर्ग खुला! सुलाई (सूर्या) धबधब्यासाठी पर्यटकांची गर्दी; प्रवेश शुल्क व वाहन शुल्क जाणून घ्या

By Nilesh Sir

August 5, 2026 6:11 am

Ads

अकोट–पोपटखेड मार्गावरील खटकाली टी-पॉईंटवरून धारगड मार्गे अवघ्या काही अंतरावर असलेला हा धबधबा घनदाट जंगल, उंच डोंगररांगा आणि फेसाळत कोसळणाऱ्या पाण्यामुळे निसर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि छायाचित्रकारांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. पावसाळ्यात धबधब्याचे रौद्र आणि मोहक रूप पाहण्यासाठी प्रत्येक शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.

पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वन विभागाने खटकाली तपासणी नाक्यावर नोंदणीची व्यवस्था केली आहे. प्रत्येक पर्यटकाने प्रथम नोंदणी करणे बंधनकारक असून, अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा!आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.प्रति व्यक्ती ४० रुपये प्रवेश शुल्क आकारले जात आहे. तसेच दुचाकीसाठी २५ रुपये आणि चारचाकी वाहनासाठी १०० रुपये वाहन शुल्क आकारण्यात येत आहे.

पर्यटकांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे या जंगल परिसरात मोबाईल नेटवर्कची समस्या असल्याने ऑनलाइन पेमेंट करण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे प्रवेश शुल्क आणि वाहन शुल्क भरण्यासाठी रोख रक्कम (कॅश) सोबत ठेवणे अधिक सोयीचे ठरणार आहे.

धबधबा परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वन विभागाकडून तपासणी नाक्यावर तसेच धबधबा परिसरात सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा!
आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.पर्यटकांनी वन विभागाच्या सूचनांचे पालन करावे, धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे तसेच प्लास्टिकमुक्त पर्यटनाला सहकार्य करून परिसराची स्वच्छता राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

यंदाच्या पावसाळ्यात सातपुड्याच्या कुशीतल्या या निसर्गरम्य सुलाई अर्थात सूर्या धबधब्याने पुन्हा एकदा पर्यटकांना भुरळ घातली असून, सुरक्षित आणि जबाबदार पर्यटनाचा आदर्श निर्माण करण्याची जबाबदारी आता प्रत्येक पर्यटकावर आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!