अकोट | प्रतिनिधी : अकोट तालुक्यातील अकोट ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम ढगा येथील पठार नाल्यात एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलिस तसेच वीर एकलव्य आपत्कालीन बचाव पथकाचे अध्यक्ष पांडुरंग तायडे, दिनेश कोरडे, रोहन सुरत्ने आणि अर्जुन ठाकूर तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
वीर एकलव्य आपत्कालीन बचाव पथकाने तत्परतेने नाल्यातील मृतदेह बाहेर काढून पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी अकोट ग्रामीण रुग्णालयात हलविला. या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

स्थानिक पातळीवर मृत युवकाची ओळख अकोट तालुक्यातील देऊळगाव येथील अंकुश भटकर (वय अंदाजे २७ वर्षे) अशी असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, अकोट ग्रामीण पोलिसांकडून अद्याप मृतदेह अंकुश भटकर यांचाच असल्याचा अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे ओळख निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शवविच्छेदन अहवालानंतर त्याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. अकोट ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनेची नोंद करून सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे ढगा व देऊळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, युवकाच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, अधिकृत माहिती तपास पूर्ण झाल्यानंतरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
सध्या शवविच्छेदन अहवाल आणि ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणातील पुढील घडामोडीकडे संपूर्ण अकोट तालुक्याचे लक्ष लागले आहे.

hw-remosaic: 0;
touch: (-1.0, -1.0);
modeInfo: ;
sceneMode: Auto;
cct_value: 0;
AI_Scene: (-1, -1);
aec_lux: 0.0;
hist255: 0.0;
hist252~255: 0.0;
hist0~15: 0.0;






Leave a Comment