Ads

वान प्रकल्पात जलसाठ्यात झपाट्याने वाढ! 109 मिमी पावसाने धरण 53.02 टक्के भरले

By Nilesh Sir

July 31, 2026 12:16 pm

Ads

सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वान प्रकल्पाच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आज, 31 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, वान प्रकल्पातील एकूण जलसाठा 43.45 एमएम³ इतका झाला असून धरण 53.02 टक्के भरले आहे.

गेल्या 24 तासांत प्रकल्प परिसरात 109 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर चालू पावसाळी हंगामात आतापर्यंत एकूण 511 मिलीमीटर पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे.

सततच्या पावसामुळे धरणातील पाण्याची आवक कायम असून जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सिंचन, पिण्याच्या पाण्याचा साठा आणि भविष्यातील जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

दरम्यान, पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेता नदी-नाल्यांच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!