Ads

धारणीच्या टिटंबा आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना अन्न विषबाधा; ३५ मुलांना रुग्णालयात दाखल

By Nilesh Sir

July 26, 2026 11:11 am

Ads

धारणी तालुक्यातील टिटंबा येथील आदिवासी आश्रमशाळेत शनिवारी रात्री जेवण केल्यानंतर निवासी विद्यार्थ्यांना उलटी आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अन्न विषबाधेची लक्षणे आढळलेल्या तब्बल ३५ विद्यार्थ्यांना तातडीने धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

भात खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास; गावकऱ्यांनी दाखवली तत्परता

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी जेवण केले. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना अचानक उलटी आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात येताच आश्रमशाळा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या.

घटनेची माहिती मिळताच टिटंबा गावातील वाहनधारकांनी विलंब न करता आपापल्या वाहनांमधून विद्यार्थ्यांना धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले.

सेंट्रल किचनमधून येते आश्रमशाळांना जेवण

धारणी तालुक्यातील संपूर्ण आदिवासी आश्रमशाळांसाठी टेंबली येथील आदिवासी आश्रमशाळेत सेंट्रल किचन सुरू आहे. याच ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी जेवण तयार करून विविध आश्रमशाळांमध्ये पाठविले जाते.

विशेष म्हणजे, आतापर्यंत केवळ टिटंबा येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनाच अन्न विषबाधेची लक्षणे आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नेमके कोणत्या कारणामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

विद्यार्थ्यांनी सांगितला त्रास; चौकशीची गरज

रुग्णालयात दाखल काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, भात खाल्ल्यानंतर उलटी आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जेवणाच्या गुणवत्तेबाबत आणि अन्नाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

या घटनेनंतर संबंधित प्रशासनाकडून अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत का, सेंट्रल किचनमधील स्वच्छता आणि अन्न तयार करण्याची प्रक्रिया कशी आहे, तसेच विद्यार्थ्यांना पाठविण्यात आलेल्या जेवणाची गुणवत्ता तपासली जाते का, याची चौकशी होणे आवश्यक आहे.

दरम्यान, ३५ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालकांमध्ये चिंता निर्माण झाली असून, या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या कशी आहे, याबाबत अधिकृत वैद्यकीय माहितीची प्रतीक्षा आहे.

Related Article

धारणीच्या टिटंबा आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना अन्न विषबाधा; ३५ मुलांना रुग्णालयात दाखल

एकाच दिवशी दोन तालुक्यांत रानडुकरांचा धुमाकूळ! अकोटनंतर तेल्हाऱ्यात 18 वर्षीय युवकावर हल्ला

आकोट रेल्वे स्टेशन परिसरात अनोळखी इसमाचा मृतदेह; शहरात खळबळ, सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

धक्कादायक! अकोट तालुक्यात रानडुकराचा शेतमजुरावर जीवघेणा हल्ला; 60 वर्षीय मजूर गंभीर जखमी

मासिक सभा न घेतल्याने सरपंच अपात्र; अकोला जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, आगेखेड ग्रामपंचायतीत खळबळ

Akola Central Jail News: अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्याची आत्महत्या; कडक सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!