Ads

धक्कादायक! अकोट तालुक्यात रानडुकराचा शेतमजुरावर जीवघेणा हल्ला; 60 वर्षीय मजूर गंभीर जखमी

By Nilesh Sir

July 25, 2026 1:14 pm

Ads

अकोट तालुक्यातील वस्तापूर-मानकरी शेतशिवारात रानडुकराने एका शेतमजुरावर अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात रमेश शिवराम कसदे (वय 60) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर पुढील उपचारासाठी अकोला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश कसदे हे नेहमीप्रमाणे शेतात काम करत असताना अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या. स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, जखमा गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रेफर केले.

या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिकांच्या संरक्षणासाठी शेतात जाणाऱ्या नागरिकांना वन्यप्राण्यांचा वाढता धोका जाणवत असून, वन विभागाने तातडीने उपाययोजना करून रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

रानडुकरांच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर होतच आहे, शिवाय आता मानवी जीवितालाही धोका निर्माण होत असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!