Ads

अकोटमध्ये उत्साहात शिवराज्याभिषेक दिन साजरा

By Nilesh Sir

June 27, 2026 7:25 pm

Ads

अकोट :- ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या पवित्र तिथीनिमित्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन अकोट शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले आणि स्वराज्याच्या महान इतिहासाला उजाळा दिला.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, अभिषेक, पुष्पहार अर्पण तसेच घोषणांनी परिसर दणाणून गेला. “जय भवानी… जय शिवाजी” च्या घोषणांनी वातावरण शिवमय झाले. विविध सामाजिक, धार्मिक आणि शिवप्रेमी संघटनांच्या सहभागामुळे सोहळ्याला विशेष उत्साह लाभला.

हा सोहळा केवळ ऐतिहासिक घटना नसून न्याय, स्वाभिमान, धर्मनिरपेक्षता, लोककल्याण आणि आदर्श शासनव्यवस्थेचे प्रतीक असल्याचेही मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तरुणांना शिवचरित्राचा आदर्श घेऊन राष्ट्रसेवा, समाजसेवा आणि स्वाभिमानाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले.

शिवरायांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वराज्याच्या मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प उपस्थित शिवभक्तांनी यावेळी व्यक्त केला. अकोटमध्ये पार पडलेल्या या शिवराज्याभिषेक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर शिवमय वातावरणाने भारावून गेला.

No comments to show.

Leave a Comment