Ads

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अकोल्यात भव्य वृक्षारोपण; ‘ग्रामीण स्वयंरोजगार शिक्षण संस्थे’चा स्तुत्य उपक्रम

By Nilesh Sir

June 5, 2026 8:42 pm

Ads

अकोला न्युज नेटवर्क ब्युरो अकोला पातूर तालुका प्रतिनिधी स्वप्नील सुरवाडे :- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत सेंट-ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, अकोला यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. संस्थेच्या आवारात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून निसर्ग संरक्षण आणि शाश्वत विकासाचा संकल्प यावेळी करण्यात आला.

सध्या वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलन ही जागतिक चिंता बनली आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणाचे संरक्षण आणि हरित विकासाला चालना देणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. याच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सेंट-ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हा प्रेरणादायी उपक्रम राबविला.

या वृक्षारोपण मोहिमेद्वारे संस्थेच्या परिसरात विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश केवळ घोषणांपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून समाजासमोर आदर्श निर्माण करण्यात आला.

या कार्यक्रमाला संस्थेचे डायरेक्टर विद्याशंकर, सिनियर फॅकल्टी श्वेता गेदम, सिनियर असिस्टंट पूनम देशमुख, फॅकल्टी रश्मी घाटोळ, शुभम सेलूकर, डीएस ट्रेनर दिपाली ससाने, बबिता चव्हाण तसेच ज्वेलरी मेकिंग आणि ब्युटी पार्लर अभ्यासक्रमातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देण्याचा संकल्प केला. या उपक्रमातून पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत होणार असून समाजात सकारात्मक संदेश पोहोचला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!