Ads

मेंढ्या सांभाळताना काळाने घातला घाला; २२ वर्षीय उषाचा विहिरीत पडून दुर्दैवी अंत

By Nilesh Sir

June 2, 2026 8:53 pm

Ads

घराचा आधार, कुटुंबाची आशा आणि मेंढपाळ व्यवसायातून संसाराला हातभार लावणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना .अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील अकोलखेड परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली असून, मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या 22 वर्षीय तरुणीचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उषा दीपक पारखे (वय 22, रा. कारला) या मेंढपाळ व्यवसाय करीत होत्या. अकोलखेड येथील रमेश केदार यांच्या शेतातील विहिरीजवळ त्या मेंढ्या चारत असताना ही दुर्घटना घडली. संबंधित विहिरीला संरक्षणासाठी कथडा नसल्याने मेंढीला सावरण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल गेला आणि पाय घसरून त्या थेट विहिरीत पडल्या.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी अथक प्रयत्न करून विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. मात्र तोपर्यंत उषा पारखे यांचा मृत्यू झाला होता.

घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोट ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून शेतातील उघड्या व कथडा नसलेल्या विहिरींबाबत पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!