Ads

अकोला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची मोठी कामगिरी; १३३ अपहरण गुन्ह्यांचा उलगडा

By Nilesh Sir

May 27, 2026 6:14 pm

Ads

अकोला जिल्ह्यात महिला व बालकांवरील अत्याचार तसेच अपहरण प्रकरणांच्या तपासात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने उल्लेखनीय कामगिरी बजावत आजपर्यंत तब्बल १३३ गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. पीडित मुलींचा कसून शोध घेत आरोपींना अटक करण्यात कक्षाला यश मिळत असल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी तसेच शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष महिला व बाल अत्याचारासंदर्भातील गुन्ह्यांचा तपास करत आहे.

दरम्यान, बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या अपहरण प्रकरणात पीडित मुलगी आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक मुंबईला रवाना करण्यात आले होते. गुप्त माहितीच्या आधारे मानखुर्द (पूर्व), मुंबई येथील सिंधुदुर्ग चाळ परिसरातून पीडित मुलगी आणि आरोपी अजीम खान अफजल खान याला ताब्यात घेण्यात आले.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने दोघांना अकोल्यात आणून पुढील तपासासाठी बाळापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या कारवाईत सपोनि कविता फुसे, मपोहवा लतिका मैंद, दिनेशकुमार शिरसाट, वैशाली रणवीर, शिल्पा मगर तसेच इतर पथकातील कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून अशाच प्रकारे तत्पर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!