Ads

पातूर-अकोला रोडवर ‘बर्निंग व्हॅन’चा थरार!

By Nilesh Sir

May 12, 2026 8:20 pm

Ads

ANN न्यूज नेटवर्क पातूर प्रतिनिधी : स्वप्निल सुरवाडे अकोला जिल्ह्यातील पातूर-अकोला मुख्य मार्गावर मंगळवारी सायंकाळी एक थरारक घटना घडली. चिखलगाव परिसरात रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या मॅक्झिमो चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण वाहन जळून खाक झाले.

ही घटना सायंकाळी पाचच्या सुमारास अकोला-वाशिम महामार्गावर घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या मॅक्झिमो गाडीतून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणांतच वाहनाने पेट घेतला. भर उन्हात आणि वाढत्या तापमानामुळे आगीने काही मिनिटांत संपूर्ण वाहनाला वेढा घातला.

घटनेची माहिती मिळताच पातूर नगर परिषदेच्या अग्निशामक विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक विभागाचे कर्मचारी सै. अश्फाक आणि प्रल्हाद वानखडे यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती.

सुदैवाची बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित मॅक्झिमो गाडीमध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे ती गेल्या दोन दिवसांपासून त्याच ठिकाणी उभी होती. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चांगलाच वाढला असून उष्णतेमुळेच वाहनाने पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेमुळे काही काळ महामार्गावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!