Ads

अकोल्यात IPL सट्ट्यावर पोलिसांचा छापा! दोन आरोपी जेरबंद,

By Nilesh Sir

April 12, 2026 3:38 pm

Ads

अकोला शहरात IPL क्रिकेट सट्ट्यावर मोठी कारवाई करत पोलिसांनी दोन आरोपींना रंगेहाथ पकडले असून, या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला तपास पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर देशमुख फेल परिसरातील एफ.सी.आय. गोडावूनजवळील मोकळ्या जागेत छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी शुभम कैलास थोरात (वय 30) आणि शिवमोहन उर्फ भोला यादव (वय 36) हे मोबाईलद्वारे IPL सामन्यावर ऑनलाइन सट्टा खेळताना आढळून आले.पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींच्या ताब्यातून दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त केली. एकूण 34,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

तपासादरम्यान आरोपींनी मोहित शर्मा आणि हर्षल चाळसे (अकोला) यांची नावे सांगितली असून हे दोघे सध्या फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.या प्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 314/26 अंतर्गत महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी.पी. रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शहरात वाढत चाललेल्या ऑनलाइन सट्टेबाजीवर पोलिसांचा अंकुश; पुढे आणखी मोठ्या कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!