Ads

दहीहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रमजान ईद उत्साहात; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

By Nilesh Sir

March 21, 2026 9:09 am

Ads

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक 20 मार्च 2026:- दहीहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा करण्यात आला. सकाळपासूनच नागरिकांनी मशिदींमध्ये नमाज अदा करत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

सणाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दहीहंडा पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठाणेदार गोपाळ ढोले यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधिकारी व कर्मचारी विविध ठिकाणी तैनात करण्यात आले होते. संवेदनशील भागात विशेष लक्ष ठेवून सतत गस्त घालण्यात आली.

ईदच्या निमित्ताने परिसरात बंधुभाव आणि सौहार्दाचे वातावरण पाहायला मिळाले. नागरिकांनी शांततेत सण साजरा करत प्रशासनाला सहकार्य केले. पोलिसांच्या दक्षतेमुळे संपूर्ण परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

दरम्यान, ठाणेदार गोपाळ ढोले यांनी नागरिकांना शांतता आणि एकोपा कायम राखण्याचे आवाहन केले. “सण-उत्सव शांततेत साजरे व्हावेत, यासाठी पोलिस सदैव तत्पर आहेत,” असे त्यांनी सांगितले.

या यशस्वी बंदोबस्तामुळे दहीहंडा परिसरात ईदचा सण सुरक्षित आणि आनंदी वातावरणात पार पडल्याचे चित्र दिसून आले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!