Ads

पातूरमध्ये संशयास्पद मांस वाहतूक उघड! पिकअप पकडला, आरोपी फरार; पोलिसांची कारवाई कुठे अडकली?

By Nilesh Sir

March 17, 2026 8:06 am

Ads

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो प्रतिनिधी स्वप्नील सुरवाडे अकोला जिल्ह्यातील पातूर येथे गोमांस सदृश्य मांसाची वाहतूक उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी (१५ मार्च) रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास वाशिमहून अकोल्याकडे येणारा बोलेरो पिकअप (MH 04 FD 6928) पातूरजवळील माऊली बारसमोर टायर फुटल्याने दुभाजकाला धडकला.

अपघातानंतर मदतीसाठी धावलेल्या स्थानिक नागरिकांना वाहनातून येणारा तीव्र वास जाणवला. संशय आल्याने पाहणी केली असता वाहनात गोवंशीय सदृश मांस भरलेले असल्याचे दिसून आले. नागरिकांनी चालकाला याबाबत विचारणा केली असता, तो तात्काळ घटनास्थळावरून फरार झाला.

घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नॅशनल हायवे ऑथोरिटीच्या क्रेनच्या सहाय्याने वाहन रस्त्याच्या कडेला लावून वाहतूक सुरळीत केली. मात्र, या घटनेला २४ तासांहून अधिक कालावधी लोटूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा अधिकृत माहिती समोर आली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

“वाहन पकडलं, पण आरोपी कुठे?” असा सवाल उपस्थित होत असून, या प्रकरणात नेमकं पाणी कुठं मुरलंय, अशी चर्चा जोर धरत आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करून अशा बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!