Ads

ऑपरेशन प्रहारचा धडाका; जुगार अड्ड्यावर अकोट ग्रामीण पोलिसांची धाड, सहा आरोपी ताब्यात

By Nilesh Sir

March 11, 2026 5:51 am

Ads

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो अकोट (अकोला) : जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत अकोट ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत आंबोडा गावातील जुगार अड्ड्यावर धाड टाकून सहा जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एकूण १ लाख २२ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० मार्च २०२६ रोजी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली. ग्राम आंबोडा येथे गणेश अस्वार यांच्या पानटपरीच्या मागील बाजूस इलेक्ट्रिक लाईटच्या उजेडात ‘तितली भवरा’ बोर्डवर पैशाचा हार-जीतचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह तात्काळ घटनास्थळी धाड टाकली. धाडीत सहा जण ‘तितली भवरा’ बोर्डवर पैशांचा जुगार खेळताना रंगेहात आढळले. पोलिसांनी पंचासमक्ष सर्व आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींची नावे सागर रविंद्र सिरस्कार, श्रीपाल सुखदेव श्रीनाथ, गोपाल सुखदेव सिरस्कार, गोपाल किसन ताडे, राजेश विनायक वानखडे आणि शिवदास देविदास सिरस्कार (सर्व रा. आंबोडा, ता. अकोट, जि. अकोला) अशी आहेत.

कारवाईदरम्यान घटनास्थळावरून तितली भवरा बोर्ड, रोख रक्कम २,०६० रुपये तसेच अंदाजे १ लाख २० हजार रुपये किंमतीच्या दोन मोटरसायकली असा एकूण १,२२,०६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपींविरुद्ध अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वासुदेव ठासरे पुढील तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे, स.पो.उपनिरीक्षक वासुदेव ठासरे, पोहेकॉ हरिष सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीत राऊत, गोपाल जाधव, नंदकिशोर नेमाडे आणि नितीन तेलगोटे यांनी सहभाग घेतला.

जिल्ह्यात ऑपरेशन प्रहार अंतर्गत अवैध धंद्यांवर पोलिसांचा ससेमिरा सुरू असून, पुढील काळात अशा कारवाया आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!