Ads

गोवंश तस्करीचा पर्दाफाश! अकोट ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, आरोपी ताब्यात

By Nilesh Sir

March 9, 2026 7:12 am

Ads

अकोट ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत गोवंशीय प्राण्यांची तस्करी करणाऱ्या आरोपीवर मोठी कारवाई करत मालवाहू वाहनासह दोन बैल जप्त केले आहेत. या कारवाईत एकूण ३ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. ७ मार्च २०२६ रोजी पेट्रोलिंग दरम्यान अकोट ग्रामीण पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, अंजनगाव (जि. अमरावती) येथून अकोट-अंजनगाव मार्गाने कत्तलीसाठी गोवंशीय प्राण्यांची वाहतूक केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अकोट-अंजनगाव रोडवरील वाई फाट्यासमोर पठार नाल्याजवळ नाकाबंदी केली.

दरम्यान, अंजनगावकडून येणारे महिंद्रा सुप्रो (MH-27 BX-8254) मालवाहू वाहन थांबवून तपासणी करण्यात आली. चालकाने आपले नाव शेख मुजाहीद शेख मजीद (वय २१, रा. भालदारपुरा, अंजनगाव सुर्जी) असे सांगितले. वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता, कत्तलीसाठी निर्दयतेने कोंबून वाहतूक केलेले दोन गोवंशीय बैल आढळून आले.

पोलिसांनी ६५ हजार रुपये किंमतीचे दोन बैल आणि ३ लाख रुपये किंमतीचे मालवाहू वाहन असा एकूण ३,६५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक २६८/२०२६ अंतर्गत महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने केली.

या कारवाईमुळे अकोट परिसरातील गोवंश तस्करीवर मोठा आळा बसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!