Ads

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, आदर्श अंगीकारण्याची गरज :मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने

By Nilesh Sir

March 6, 2026 9:16 pm

Ads

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो अनुराग अभंग प्रतिनिधी अकोला : महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चालणे आणि त्यांचे आदर्श जीवनात अंगीकारणे आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी केले. जय बाभळेश्वर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने (तिथीनुसार) ६ मार्च २०२६ रोजी आयोजित शिवजयंती सोहळ्यात ते बोलत होते.


जय बाभळेश्वर मंदिराच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या देखण्या किल्ले पुरंदरच्या प्रतिकृतीवर विराजमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे डॉ. सुनील लहाने यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी आमदार नितीन देशमुख, माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया, पत्रकार रवी टाले, किशोर मांगटे पाटील, गोपाल दातकर, कृष्णा शर्मा, अर्चना शर्मा, सोनाली सरोदे, मनोज पाटील, अभय खुमकर, मधुर खंडेलवाल, प्रशंसा अंबेरे, राहुल कराळे, रवि गोतमारे, विजय इंगळे, पंकज गावंडे, राजेश काळे आदी मान्यवर उपस्थित होते.


महिलांची मशाल यात्रा
शिवजयंतीनिमित्त गुरुवार, ५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी नगर येथील आई तुळजाभवानी मंदिरातून महिलांची मशाल यात्रा काढण्यात आली. ही मशाल यात्रा जय बाभळेश्वर मंदिराच्या प्रांगणात येऊन संपन्न झाली. यावेळी महिला व युवतींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून आरती करण्यात आली.


मान्यवरांचा सत्कार
या प्रसंगी आयोजकांच्या वतीने उद्धव सेनेचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, शिंदे सेनेचे नेते गोपिकिशन बाजोरिया यांच्यासह साहित्य क्षेत्रातील डॉ. शैलेंद्र दुबे, क्रीडा क्षेत्रातील मृणालिनी गाढे, वेदश्री योगेश गोतमारे तसेच अर्पिता आनंद बुलबुले यांचा सत्कार करण्यात आला.


डाबकी रोड परिसरात भव्य मिरवणूक
सायंकाळी ७ वाजता डाबकी रोड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत महिला, युवती आणि चिमुकल्या मावळ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचा समारोप छत्रपती शिवाजी नगर येथील भाजी बाजारातील शिवरायांच्या प्रतिमेसमोर करण्यात आला.


दरम्यान, शनिवार ७ मार्च रोजी रात्री ८ वाजता शिवपूजन करून शिवजन्मोत्सव सोहळ्याचा समारोप करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!