Ads

--

चोहोट्टा बाजार महसूल मंडळात मातीचा काळाबाजार?कागदोपत्री कारवाई आणि प्रत्यक्षात मोकळीक?प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

By Nilesh Sir

March 5, 2026 4:56 am

Ads

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो प्रतिनिधी दिनांक ५मार्च २०२५:-अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार महसूल मंडळ अंतर्गत मोठ्या प्रमाणात विना परवाना मातीची वाहतूक सुरू असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या परिसरातून मोठ्या प्रमाणात माती टिप्परद्वारे बाहेरील तालुक्यांमध्ये तसेच इतर जिल्ह्यांमध्ये पाठवली जात आहे. या मातीचा वापर विटा तयार करण्यासाठी केला जात असल्याचे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे ही माती वाहतूक पूर्णपणे अवैध मार्गाने होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. तरीदेखील यावर महसूल प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, या भागात दिवस-रात्र टिप्परची ये-जा सुरू असते. मोठ्या प्रमाणात माती काढून ती बाहेरील तालुक्यात पाठवली जात असताना महसूल विभागाकडून केवळ कागदोपत्री कारवाई केली जाते, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. काही वेळा महसूल प्रशासन एकदिवशीय कारवाई करून मोकळे होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

या प्रकारामुळे शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल तोटा होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नियमांनुसार माती उपसण्यासाठी परवानगी घेणे आणि रॉयल्टी भरणे आवश्यक असते. मात्र येथे विना परवाना मोठ्या प्रमाणात माती उपसली जात असल्याने शासनाच्या महसुलावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात माती टिप्परद्वारे बाहेर जात असताना प्रशासन झोपेत आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून अवैध माती वाहतुकीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!