Ads

जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई; २५० हून अधिक घरगुती गॅस सिलेंडर जप्त पुरवठा विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, वर्षा मीना यांच्या सकारात्मक पुढाकाराचे कौतुक

By Nilesh Sir

February 28, 2026 8:23 pm

Ads

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो जिल्हा प्रतिनिधी अनुराग अभंग घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सर्रासपणे होत असलेल्या गैरवापरावर अखेर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात वर्षा मीना यांनी तत्परता दाखवत आवश्यक वस्तू कायद्यांतर्गत कारवाईचे आदेश दिल्यानंतर अकोला शहरात धाडसत्र राबविण्यात आले.‘अकोला न्यूज नेटवर्क’ने या गैरप्रकाराबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेतली.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा पुरवठा विभागामार्फत पाच विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली. या पथकांनी शहरातील विविध भागांत एकाच वेळी छापे टाकत कारवाई केली.जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसर, खडकी, उमरी, जुने शहर, डाबकी रोड, वाशिम बायपास, हरिहर पेठ, बाजारपेठ, सिंधी कॅम्प आदी भागांत धाड टाकून विविध हॉटेल, चहा टपऱ्या आणि उपहारगृहांमधून घरगुती वापराचे अडीचशेहून अधिक सिलेंडर जप्त करण्यात आले.

या कारवाईत सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आहे.या धडक कारवाईमुळे घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले असले, तरी अकोला जिल्हा पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर गैरवापर सुरू असताना विभागाने यापूर्वी ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाई का केली नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी घेतलेली सकारात्मक भूमिका आणि दाखवलेली प्रशासनिक कणखरता निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र, केवळ एकदिवसीय कारवाई न राहता अशा धाडसत्रांचे सातत्य ठेवले गेले तरच घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक गैरवापर थांबू शकतो.सामान्य नागरिकांना अनुदानित दरात मिळणारा घरगुती गॅस काळ्या बाजारात वळवला जात असल्याने शासनाच्या महसुलाला फटका बसतो आणि ग्राहकांनाही सिलेंडर टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे पुरवठा विभागाने पुढाकार घेत नियमित तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Related Article

एकतर्फी प्रेमाचा विकृत सूड? निष्पाप चिमुकल्याची निर्घृण हत्या;

जिवंतपणी कुणी नव्हतं सोबत… मृत्यूनंतर मिळाला माणुसकीचा खांदा! अकोटमध्ये अनोळखी मृतदेहांना सन्मानाने निरोप देणारे पांडुरंग तायडे

जीवाशी खेळ? प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात आढळला डॉक्टरांचा ग्लोव्ह

चिचखेड फाट्यावर भीषण अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत चारचाकीचा चुराडा, चालक गंभीर जखमी

जन्माआधीच मृत्यूची नोंद!प्रसूती वेदनांपासून मृत्यूच्या वेदनेपर्यंत; एका आईची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

LCB अडचणीत; बुलढाण्यात पोलिसांचा मोठा घोळ? जिच्या हत्येप्रकरणी वडील-भाऊ जेलमध्ये, तीच तरुणी निघाली जिवंत, LCB च्या तपासावर गंभीर प्रश्न

No comments to show.

Leave a Comment