Ads

--

सातपुड्यात रंगणार शिवभक्तीचा सोहळा; धारगड येथे महाशिवरात्री दर्शन उत्सव

By Nilesh Sir

February 10, 2026 5:59 pm

Ads

सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या पवित्र श्री क्षेत्र धारगड येथे महाशिवरात्री निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांसाठी विशेष धार्मिक व सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 15 फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र धारगड सेवा समिती, अकोट यांच्या वतीने दर्शनासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी फराळ वाटपाची व्यवस्था करण्यात आली आहे.


महाशिवरात्री निमित्त सकाळपासून ते सायंकाळी 3 वाजेपर्यंत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रात असलेले धारगड शिवमंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. त्यामुळे दुर्गम भागात असलेल्या या पवित्र स्थळाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे.

वाहन व प्रवास व्यवस्था
भाविकांच्या सोयीसाठी धारगड टी-पॉईंट येथे वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून पुढे मंदिराकडे पायी जाणे बंधनकारक राहणार आहे.


चारचाकी वाहनांना टी-पॉईंटपर्यंत प्रवेश
दुचाकी वाहनांना खट काली गेटपर्यंत परवानगी
तेथून पुढे वन विभागाच्या वाहनाने ने-आण व्यवस्था
प्रती व्यक्ती 20 रुपये शुल्क
दुपारी 3 नंतर कोणत्याही वाहनास प्रवेश नाही


फराळ व पिण्याच्या पाण्याची सोय
टी-पॉईंट परिसरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अकोट तसेच धारगड सेवा समिती यांच्या वतीने फराळ व पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. दुर्गम मार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी ही सेवा दिलासादायक ठरणार आहे.


आयोजकांचे आवाहन
वन विभागाच्या नियमांचे पालन करून, शिस्त राखत व पर्यावरण संवर्धनाची काळजी घेत दर्शन घ्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Related Article

मामू लेट जा, तेरी तो वाट लगने वाली है! अकोला रेल्वे प्लॅटफॉर्मवर चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीती

शाळा सुरू होण्यापूर्वी पालकांना महागाईचा धक्का! वह्या-पुस्तकांसह शालेय साहित्य महागले

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अकोल्यात भव्य वृक्षारोपण; ‘ग्रामीण स्वयंरोजगार शिक्षण संस्थे’चा स्तुत्य उपक्रम

मान्सूनपूर्व मोठी तयारी! पोपटखेडमध्ये SDRF चे विशेष आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पळसखेड नागो येथे भव्य वृक्षारोपण; आमदार संजय गायकवाड यांचे पर्यावरण संवर्धनाचे आवाहन

अकोला-दर्यापूर रोडवर भीषण अपघात : पती-पत्नीचा जागीच मृत्यू; 2 तासांत ट्रक चालक व क्लिनर पोलिसांच्या ताब्यात

No comments to show.

Leave a Comment