Ads

चांदखां प्लॉट व सोनटक्के प्लॉटमध्ये जुगार अड्डे पुन्हा सुरू; संरक्षण कोणाचे?

By Nilesh Sir

February 9, 2026 7:31 pm

Ads

अकोला अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कडक भूमिकेमुळे जुने शहर परिसरातील अनेक बेकायदेशीर धंदे बंद झाल्याचे चित्र दिसून आले होते. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्था प्रभावीपणे अमलात येत असल्याचा दिलासा नागरिकांना मिळाला होता. मात्र, मनपा निवडणूक पार पडून काही काळ जाताच पुन्हा एकदा अवैध व्यवसायांनी डोके वर काढल्याचे समोर येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, चांदखां प्लॉट तसेच सोनटक्के प्लॉट या परिसरात जुगाराचे टेबल पुन्हा सुरू झाल्याची चर्चा आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, या जुगार अड्ड्यांना नेमके कोणाचे संरक्षण मिळत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.विशेष म्हणजे, निवडणुकीपूर्वी पोलिसांनी राबविलेल्या कारवाईमुळे जुगार, दारूविक्री व इतर अवैध व्यवसायांवर आळा बसल्याचे दिसत होते. परंतु आता पुन्हा त्याच ठिकाणी जुगार अड्डे सुरू झाल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, अशा अवैध धंद्यांमुळे परिसरातील तरुण भरकटत असून, गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना मिळत आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने छापा टाकून कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.दरम्यान, या प्रकाराला कोणाची परवानगी किंवा आश्रय आहे, याची चौकशी करण्याची जबाबदारी आता जिल्हा पोलीस अधीक्षकांवर येऊन पडली आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा अवैध अड्ड्यांवर पुन्हा एकदा जोरदार कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!