Ads

लक्ष्मी नगर, डाबकी रोडवर महावितरणचा भोंगळ कारभार; उघड्यावर डीपीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका

By Nilesh Sir

February 7, 2026 10:43 am

Ads

अकोला शहरातील लक्ष्मी नगर, डाबकी रोड परिसरात महावितरण कंपनीच्या हलगर्जी कारभारामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. परिसरातील वीज वितरणासाठी बसविण्यात आलेली डीपी (डिस्ट्रिब्युशन बॉक्स) उघड्यावर व असुरक्षित अवस्थेत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सदर डीपीला संरक्षक कव्हर नसून वायरिंगही उघड्यावर दिसत आहे. लहान मुले, पादचारी तसेच जनावरे या भागातून सतत ये-जा करत असल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे. पावसाळ्यात किंवा ओलसर हवामानात विद्युत धक्का बसण्याचा धोका अधिक तीव्र होतो, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

याबाबत स्थानिकांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी केल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप कोणतीही ठोस दुरुस्ती किंवा सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे महावितरणच्या निष्काळजीपणाविरोधात संताप व्यक्त होत आहे.

परिसरातील रहिवाशांनी तात्काळ डीपी सुरक्षित कव्हरमध्ये बसविणे, उघड्या वायरिंगची दुरुस्ती करणे व आवश्यक सुरक्षा जाळी उभारणे, अशी मागणी केली आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण प्रशासनावर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

दरम्यान, जीवितास धोका निर्माण करणाऱ्या अशा उघड्या विद्युत यंत्रणांबाबत महावितरणने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!