Ads

मंगरुळपीर हादरलं! वीटभट्टी परिसरात चिमुकलीचा पडक्या विहिरीत दुर्दैवी अंत

By Nilesh Sir

February 3, 2026 11:56 am

Ads

वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात हृदयद्रावक घटना घडली असून, वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगाराची तीन वर्षीय चिमुकली खेळत असताना पडक्या विहिरीत कोसळून मृत्युमुखी पडली. सुंदरी धनसिंग सिसोदिया (वय ३ वर्षे, रा. झिर पांजरिया, ता. नेपानगर, जि. बुऱ्हाणपूर) असे मृत बालिकेचे नाव आहे.

मंगरुळपीर ते वाशीम मार्गावर वीज केंद्राजवळील वीटभट्टी परिसरात ही दुर्दैवी घटना २ फेब्रुवारी रोजी घडली. वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबाची ही चिमुकली परिसरात खेळत असताना अचानक जवळील पडक्या विहिरीत पडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले.

मंगरुळपीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके यांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनद्वारे संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना पाचारण केले. बचाव पथकाने विहिरीत उतरून शोधमोहीम राबवली, मात्र दुर्दैवाने चिमुकलीचा मृतदेहच हाती लागला.

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, अवघ्या तीन वर्षांच्या निष्पाप जीवाच्या जाण्याने वीटभट्टी कामगाराच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पडक्या विहिरींमुळे वाढणाऱ्या धोक्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!