Ads

---

निवडणुकीचा हळदी-कुंकू फॉर्म्युला! जिल्हा परिषद सर्कलमध्ये राजकारण तापलं, महिलावोट बँकेसाठी गावागावात कार्यक्रमांचा पाऊस

By Nilesh Sir

January 25, 2026 6:58 am

Ads

महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच आता ग्रामीण भागात राजकारणाचा ताप चढू लागला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावागावात हालचालींना वेग आला असून, कधी न झालेले सामाजिक कार्यक्रम अचानक मोठ्या प्रमाणात आयोजित केले जात असल्याचे चित्र दिसत आहे.

विशेष म्हणजे सध्या सुरू असलेल्या हळदी-कुंकू कार्यक्रमांचा राजकीय वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून गावागावात भव्य हळदी-कुंकू समारंभ, भेटवस्तू वाटप, महिला मेळावे आणि सत्कार सोहळ्यांची रेलचेल सुरू आहे.

ग्रामीण भागात महिला मतदारांची संख्या मोठी असल्याने हीच मतपेढी आपल्या बाजूने वळवण्यासाठी अनेकांनी “संस्कृतीच्या नावाखाली प्रचार” असा नवा फॉर्म्युला राबवायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी तर राजकीय चिन्हे, फोटो आणि अप्रत्यक्ष प्रचाराचा वापर होत असल्याच्याही चर्चा रंगू लागल्या आहेत.

निवडणूक जाहीर होण्याआधीच सुरू झालेली ही रणधुमाळी पाहता, आगामी जिल्हा परिषद निवडणुका अधिक रंगतदार आणि चुरशीच्या होणार, हे मात्र नक्की. ग्रामीण राजकारणात हळदी-कुंकूची रंगत नेमकी किती प्रभाव टाकणार, हे निकालाच्याच दिवशी स्पष्ट होणार आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!