Ads

--

बातमीचा परिणाम थेट मैदानात! उमरा शेतकऱ्यांना अखेर दिवसा वीज मिळाली

By Nilesh Sir

January 20, 2026 5:10 pm

Ads

उमरा सर्कलमधील वीजपुरवठा, वन्य प्राण्यांचे हल्ले आणि अभियंत्यांच्या वर्तनावरून संतप्त झालेल्या शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नांना ANN Akola News Network ने आवाज दिल्यानंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेतली आहे. बातमी प्रसिद्ध होताच महावितरणने महत्त्वाचा निर्णय घेत उमरा 33 केव्ही फिडर अंतर्गत येणाऱ्या 11 केव्ही फीडर्सचा दिवसा वीजपुरवठा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारपासून 33 केव्ही जितापूर सब-स्टेशनमधून निघणारे सर्व 11 केव्ही फीडर्स सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 या वेळेत तीन फेजमध्ये सुरू राहणार आहेत. त्यामुळे रात्री शेतात जावे लागणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

याआधी उमरा सर्कलमधील शेतकरी व नागरिकांनी महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत दिवसा वीजपुरवठा, सतत होणारी वीज खंडितता थांबवणे, तसेच शेतकऱ्यांशी अर्वाच्य वागणूक देणाऱ्या अभियंत्याची तात्काळ बदली करण्याची मागणी केली होती. रात्री वीजपुरवठ्यामुळे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांचा धोका वाढत असल्याने जीवित सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र आता महावितरणच्या या निर्णयामुळे उमरा सर्कलमधील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे. पुढील काळात वीजपुरवठा सुरळीत राहतो का, याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Article

एकतर्फी प्रेमाचा विकृत सूड? निष्पाप चिमुकल्याची निर्घृण हत्या;

जिवंतपणी कुणी नव्हतं सोबत… मृत्यूनंतर मिळाला माणुसकीचा खांदा! अकोटमध्ये अनोळखी मृतदेहांना सन्मानाने निरोप देणारे पांडुरंग तायडे

जीवाशी खेळ? प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात आढळला डॉक्टरांचा ग्लोव्ह

चिचखेड फाट्यावर भीषण अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत चारचाकीचा चुराडा, चालक गंभीर जखमी

जन्माआधीच मृत्यूची नोंद!प्रसूती वेदनांपासून मृत्यूच्या वेदनेपर्यंत; एका आईची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

LCB अडचणीत; बुलढाण्यात पोलिसांचा मोठा घोळ? जिच्या हत्येप्रकरणी वडील-भाऊ जेलमध्ये, तीच तरुणी निघाली जिवंत, LCB च्या तपासावर गंभीर प्रश्न

No comments to show.

Leave a Comment