Ads

अकोटमध्ये राजकीय भूकंप! AIMIM सोबत युती केल्याने भाजप नेत्याला नोटीस; प्रदेशाध्यक्षांचा थेट इशारा

By Nilesh Sir

January 7, 2026 5:58 pm

Ads

नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणूक 2025 नंतर अकोटच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या ध्येय-धोरणांना छेद देत AIMIM सोबत युती केल्याचा ठपका ठेवत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी संबंधित पदाधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे अकोटसह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

प्रदेशाध्यक्षांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, अकोट नगरपरिषदेत AIMIM सोबत युती करून भाजपच्या धोरणांना ‘सुरंग’ लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही युती करताना पक्षातील कोणत्याही वरिष्ठ नेत्यांना किंवा संघटनात्मक पातळीवर विश्वासात घेण्यात आले नाही. या कृतीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा गंभीर आरोपही नोटीसमध्ये करण्यात आला आहे.

“अशी कृती ही पक्षशिस्तीला धरून नाही. त्यामुळे आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत तातडीने खुलासा करावा,” असा थेट इशारा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिला आहे. या नोटीसमुळे संबंधित नेत्याची अडचण वाढली असून, पक्षांतर्गत कारवाई अटळ असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे भाजपच्या शिस्तबद्ध संघटनात्मक भूमिकेचा पुनरुच्चार झाल्याचेही राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आता संबंधित पदाधिकारी काय खुलासा करतात आणि पक्ष नेतृत्व पुढे काय निर्णय घेते, याकडे अकोटसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!