Ads

अकोला महापालिका रणधुमाळीचा बिगुल अर्जांची मुदत संपताच राजकीय चित्र स्पष्ट; शक्तिप्रदर्शनात उमेदवारी दाखल

By Nilesh Sir

December 31, 2025 10:57 am

Ads

अकोला महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवारी संपताच शहरातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. अखेरच्या दिवशी महापालिकेच्या सहा झोन कार्यालयांसमोर उमेदवार, समर्थक आणि पक्षनेत्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. ढोल-ताशे, फटाके, मिरवणुका आणि जोरदार घोषणाबाजीच्या वातावरणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

यंदा भाजपसोबत युती न झाल्यामुळे शिंदेसेनेने सर्वाधिक ७४ जागांवर उमेदवार उभे केले असून, भाजपचा मित्रपक्ष असतानाही इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार उतरवल्याने सत्तासमीकरणांमध्ये नेमका काय बदल होतो, याकडे लक्ष लागले आहे. शिंदेसेनेनंतर भाजपने ६२, उद्धवसेनेने ५५, तर काँग्रेसने ५० उमेदवार मैदानात उतरवले आहेत.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) ने ३८ उमेदवार देत स्वतंत्र राजकीय अस्तित्व ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रवादी (शरद पवार) ने २५, तर भाजपचा मित्रपक्ष राष्ट्रवादी (अजित पवार) ने १४ उमेदवार दिले आहेत. वंचित बहुजन आघाडीने ५३ उमेदवार उभे करून आपली ताकद दाखवून दिली आहे.

शहरातील २० प्रभागांतून एकूण ८० नगरसेवक निवडले जाणार आहेत. आता अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अंतिम लढतींचे चित्र स्पष्ट होणार असून, अकोला महापालिका निवडणूक अधिकच चुरशीची ठरण्याचे संकेत मिळत आहेत.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!