अकोला येथे आयोजित सत्संग सोहळ्यासाठी प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी प्रवासी वाहनाला दहीहंडा फाटा ते गोपाळखेड मार्गावर अपघात झाला. वाहनाचे स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट रस्त्याच्या खालील शेतात जाऊन पलटी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या अपघातात वाहनातील काही प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना मदत केली.
स्टेअरिंग रॉड तुटला अन् वाहन थेट शेतात!
प्राथमिक माहितीनुसार, प्रवाशांना घेऊन खासगी वाहन अकोल्याच्या दिशेने जात होते. दहीहंडा फाटा–गोपाळखेड मार्गावरील वळणावर अचानक वाहनाचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेले वाहन रस्त्याच्या खाली उतरून शेतात जाऊन पलटी झाले.अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा!आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.
अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार असले, तरी वाहनाच्या स्टेअरिंग रॉडमध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
धोकादायक वळण, सुरक्षा कठडे कुठे?
या अपघातामुळे दहीहंडा फाटा–गोपाळखेड मार्गावरील वळणाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रस्त्याच्या कडेला आवश्यक सुरक्षा कठडे नसल्याने नियंत्रण सुटलेले वाहन थेट शेतात गेल्याचे दिसून आले.अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा!
आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.

रस्त्यावर धोकादायक वळण आणि सुरक्षेचा अभाव; प्रशासनाला आणखी किती अपघातांची वाट पाहावी लागणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
सत्संग सोहळ्यासाठी आनंदाने अकोल्याच्या दिशेने निघालेले प्रवासी अपघातामुळे जखमी झाले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी काही प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा!
आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.
या घटनेनंतर संबंधित विभागाने दहीहंडा फाटा–गोपाळखेड मार्गावरील धोकादायक वळणांची पाहणी करून सुरक्षा कठडे, दिशादर्शक फलक आणि आवश्यक वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी होत आहे.
अपघातानंतर पंचनामा आणि तपासातून नेमके कारण स्पष्ट होणार असून, जखमी प्रवाशांची संख्या व प्रकृतीबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच अंतिम तपशील स्पष्ट होईल.






Leave a Comment