अकोट : अकोट शहरातील गोलबाजार परिसरात आज सकाळी अवैध गोमांस प्रकरणी पोलिसांच्या DB पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल २३५ किलो गोमांस जप्त करण्यात आले असून, चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गोलबाजार परिसरात अवैध गोमांस विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अकोट शहर पोलिसांच्या DB पथकाने सकाळी तातडीने कारवाई केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आले. पोलिसांनी २३५ किलो गोमांस जप्त करत चार संशयित आरोपींना अटक केली.अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा!आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.

ही कारवाई अकोट शहर पोलिस ठाणेदार किशोर जुनगरे यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथकाने केली. सकाळच्या वेळेत गोलबाजार परिसरात झालेल्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा!
आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींविरोधात पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. जप्त केलेल्या गोमांसाबाबतही नियमानुसार पुढील प्रक्रिया करण्यात येत आहे.
अकोट शहरातील अवैध गोमांस विक्रीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे. पुढील तपास अकोट शहर पोलिसांकडून सुरू आहे.






Leave a Comment