अकोट : अकोट शहरातील गोलबाजार परिसरात आज सकाळी अवैध गोमांस प्रकरणी पोलिसांच्या DB पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल २३५ किलो गोमांस जप्त करण्यात आले असून, चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गोलबाजार परिसरात अवैध गोमांस विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अकोट शहर पोलिसांच्या DB पथकाने सकाळी तातडीने कारवाई केली. या कारवाईत १) शे. इमरान शे. इस्माईल वय ३४ वर्ष २) जमिल अहमद अब्दल हमीद वय ५५ वर्ष ३) शारुख खान हिरेखान वय ३४ वर्ष ४) शे. मुकद्दर अब्दुल सत्तार कुरेशी वय ६१ वर्ष सर्व रा. कुरेशीपुरा अकोट हे शे. इमरान शे. इस्माईल यांचे राहते घरात गोवंश जातीचे जनावरे कृरतेने ठार करुन मासाचे टुकडे करुन विक्री करीत असतांना मिळुन आले सदरचे गोवंश जातीचे मास अंदाजे २३५ किलो किंमंत ४७०००/-रु असा मुद्देमाल जप्त .नमुद इसमावर कार्यवाही करण्यात येत आहे.अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा!आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.

ही कारवाई अकोट शहर पोलिस ठाणेदार किशोर जुनगरे यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथकाने केली. सकाळच्या वेळेत गोलबाजार परिसरात झालेल्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा!
आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींविरोधात पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. जप्त केलेल्या गोमांसाबाबतही नियमानुसार पुढील प्रक्रिया करण्यात येत आहे.
अकोट शहरातील अवैध गोमांस विक्रीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे. पुढील तपास अकोट शहर पोलिसांकडून सुरू आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अर्चित चांडक सा., मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री.बी. चंद्रकांत रेड्डी सा.मा.उप. विभागीय पोलीस अधिकारी श्री निखील पाटील सा.यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री किशोर जुनघरे, डी. बी. पथक प्रमुख पो.उपनि निलेश बाराहाते, तसेच पथकातील पोहेकॉ गणेश सोळंके, पोकॉ मोहन दुर्गे पोकॉ अश्विन चौव्हाण यांनी केली






Leave a Comment