Ads

चोहोट्टा बाजारात मटका बंद… मग एका ‘लाडक्या’ धंदेवाल्यालाच अभय कुणाचे?; पोलिसांच्या भूमिकेवर संशय

By Nilesh Sir

August 7, 2026 3:10 pm

Ads

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो अकोला:- अकोट तालुक्यातील दहीहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोहोट्टा बाजार येथे बहुतांश वरली मटका धंदे बंद असल्याचे सांगितले जात असताना, एका विशिष्ट व्यक्तीचा मटका धंदा मात्र खुलेआम सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. त्यामुळे “हा धंदा नेमका कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून इतर सर्व मटका धंदे बंद करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी एका ठराविक व्यक्तीला मात्र कोणत्याही भीतीशिवाय धंदा सुरू ठेवण्याची मुभा मिळाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे कायदा सर्वांसाठी समान आहे की काही मोजक्यांसाठी वेगळा, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

याप्रकरणी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या संगनमतातून संबंधित धंदेचालकाला संरक्षण मिळत असल्याचा संशय संदर्भात परिसरात चर्चा केला जात आहे. या चर्चेमुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

जर या धंद्याला पोलीस प्रशासनाची कोणतीही परवानगी नसेल, तर संबंधित ठिकाणी अद्याप कारवाई का करण्यात आलेली नाही? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईचे दावे करणाऱ्या यंत्रणेने या प्रकरणात मौन का बाळगले आहे, याचे उत्तर जनतेला अपेक्षित आहे.

चोहोट्टा बाजार परिसरात सुरू असलेल्या या कथित अवैध मटका व्यवसायाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी होत आहे. तसेच संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आता अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील आणि अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वस्तुस्थितीची चौकशी करतील का? तसेच कथित अवैध धंद्यावर तात्काळ कारवाई करून कायद्याचा धाक निर्माण करतील का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!