Ads

देऊळगावजवळ ट्रक-टँकरची भीषण धडक; टँकर चालकाचा जागीच मृत्यू

By Nilesh Sir

August 3, 2026 7:21 pm

Ads

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो पातूर प्रतिनिधी दि. ३ ऑगस्ट : बाळापूर–पातूर मार्गावरील देऊळगावजवळ सोमवारी (दि. ३) सायंकाळी सुमारे ५.३० वाजताच्या दरम्यान ट्रक व टँकर यांच्यात भीषण अपघात होऊन टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक RJ 09 GG 9417 हा पातूरकडून बाळापूरच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या टँकर क्रमांक GJ 16 AV 7785 ला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन पलटी झाला.

या भीषण अपघातात टँकर चालक जोगा सिंग (रा. जलईवाडा, पंजाब) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा व अन्य आवश्यक कार्यवाही सुरू केली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पातूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!