Ads

त्रिवेणी संगमाचा आणखी एक बळी! २२ वर्षीय युवकाचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

By Nilesh Sir

August 3, 2026 9:22 am

Ads

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील प्रसिद्ध वारी हनुमान येथील त्रिवेणी संगमाने पुन्हा एकदा एका तरुणाचा जीव घेतला. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील २२ वर्षीय योगेश प्रकाश वानखेडे याचा नदीच्या खोल डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी घडलेल्या या घटनेनंतर रात्रभर सुरू असलेल्या शोधमोहीमेनंतर अखेर रविवारी दुपारच्या सुमारास बचाव पथकाला युवकाचा मृतदेह शोधण्यात यश आले.

प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वारी हनुमान येथील त्रिवेणी संगम परिसरात दरवर्षी हजारो भाविक आणि पर्यटक येतात. मात्र, या ठिकाणच्या खोल डोहामुळे यापूर्वीही अनेक दुर्घटना घडल्या असून, तरीही सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा प्रश्न कायमच ऐरणीवर आहे.

शनिवारी योगेश वानखेडे पाण्यात उतरला असताना तो खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलिस, तेल्हारा महसूल प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी शोधकार्य सुरू केले. मात्र अंधार आणि नदीतील प्रवाहामुळे रात्रभर शोधमोहीम यशस्वी होऊ शकली नाही.

रविवारी सकाळी पुन्हा बचाव पथकाने शोधमोहीम हाती घेतली. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दुपारी नदीपात्रातून योगेश वानखेडे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

वारी हनुमान येथील त्रिवेणी संगमावरील वारंवार होणाऱ्या बुडून मृत्यूच्या घटना प्रशासनासाठी गंभीर इशारा आहेत. धोकादायक ठिकाणी संरक्षक कठडे, इशारा फलक, प्रशिक्षित बचाव पथक आणि कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी आता पुन्हा एकदा जोर धरत आहे. अन्यथा हा पवित्र संगम निरपराध जीवांचा बळी घेणारा ठिकाणा ठरत राहील, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!